This Portal is Connected to Production Database.

Marathi Language Pack
Thumbnail Image of पूर्णत्वाकडे वाटचाल

पूर्णत्वाकडे वाटचाल (Purnatvakade Vatchal)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

आत्म-पूर्णता व तिला प्राप्त करण्याचे सोपे साधन मिळवण्यास इच्छुक असलेला सध्याच्या काळातील विचारवान वाचक पूर्णतेचा मार्ग या पुस्तकाचे हार्दिक स्वागत करेल आणि तो आनंदित होईल. या पुस्तकामध्ये आपणास आध्यात्मिक विकासाकरिता मानवजातीच्या सर्वांत प्राचीन पद्धतीचे म्हणजेच योगपद्धतीचे तत्त्वज्ञान आणि आचरण यांबद्दल स्वच्छ आणि वैचित्र्यपूर्ण स्पष्टीकरण मिळेल. कृष्णकृपामूर्ती ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद (१८९६-१९७७) भगवद्‍गीतेत स्पष्ट केल्याप्रमाणे योगपद्धतीचे तत्त्वज्ञान उलगडून सांगतात. गीता पुढील दृश्याचे वर्णन करते : जेव्हा स्वतःची ओळख आणि उद्दिष्ट यांविषयी गोंधळलेला आणि किंकर्तव्यमूढ झालेला अर्जुन श्रीकृष्णांकडे वळतो, तेव्हा श्रीकृष्ण आपल्या या कुशल विद्यार्थ्याला “पूर्णतेचा मार्ग” समजावून सांगतात. भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशाचा सारांश असा आहे की मनुष्याने आपले जीवन भक्तियोगाभोवती केंद्रित करावे, ज्याचा अर्थ व्यक्तिगत चेतना (आत्मा) आणि परम चेतना (परमात्मा) यांचे मीलन असा होतो. आपल्या व्याख्यानांच्या या ऐतिहासिक शृंखलेच्या माध्यमातून, श्रील प्रभुपाद भक्तियोगाच्या पद्धतींचे एक सुंदर स्पष्टीकरण सादर करतात आणि या साध्यासरळ परंतु तरीही अत्यंत सर्वसमावेशक योगपद्धतीची सार्वत्रिक प्रासंगिकता प्रकाशित करतात. ते हे दाखवतात की कशा प्रकारे जे लोक आधुनिक काळातील भौतिकवादी जीवनाच्या जंजाळामध्ये अडकलेले आहेत, ते सुद्धा या अत्यंत सरळ प्रक्रियेचा वापर करून स्वतःचे मन शुद्ध करू शकतात आणि आपल्या चेतनेला परमोच्च सुखाच्या अवस्थेपर्यंत उन्नत करू शकतात.

Sample Audio

Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)