मुकुंदमाला स्तोत्र (Mukunda Mala Stotra)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
साधुवृत्तीच्या राजर्षीद्वारे श्रीकृष्णांच्या सेवेसाठी त्यांच्याकडे याचना करणाऱ्या प्रार्थना. साधुत्वाचा पिंड असणारे राजा कुलशेखर भारतामध्ये एक सहस्त्रकाच्याही पूर्वी होऊन गेलेले राजे आहेत. तथापी त्यांचे ‘मुकुंदमाला-स्तोत्र’ आजही आपल्याशी शाश्वत सत्याच्या अभिजात स्वरात संवाद साधते. अंतःकरणाच्या तळमळीतून आलेला तो स्वर एका साक्षात्कारी आत्म्याचा असून भगवंतांना आणि आपल्यालाही याचनापूर्वक आळवितो. जन्म-मृत्यूच्या रोगावरील रामबाण उपाय ऐकण्यासाठी ते सर्व लोकांना आवाहन करीत आहेत. मुकुंदमाला-स्तोत्र म्हणजे राजा कुलशेखरांची श्रीकृष्णांप्रती असणारी भक्ती आणि ते सद्भाग्य अन्य प्रत्येकाला वितरीत करण्याची त्यांची उत्कंठा यांच्या मिलाफाची अभिव्यक्ती आहे.
Sample Audio