महाराणी कुंतीची शिकवण (Maharani Kunti chi Shikvan)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
महाराणी कुंती—शोकांतिकेने भरलेले महाभारतातील एक अत्यंत शूर, साहसी पात्र, भारतवर्षाची राजगादी मिळविण्यासाठी घृणास्पद, क्रुर असे राजकारण झाले. त्याची परिणती इतिहासातील सर्वांत भयानक युद्धात झाली. कुंतीदेवीकडे असणाऱ्या आंतरिक आध्यात्मिक शक्तीने तिला व तिच्या मुलांना या अशा भयाण प्रसंगातून तारले. एका साध्वीच्या अंतःकरणातून आलेली कळकळीची ही प्रार्थना अत्यंत साधी; परंतु गहन आध्यात्मिक भावना, गूढ तत्त्वज्ञान आणि बौद्धिक स्तरावरील एक शिकवण आहे. संपूर्ण जगात आध्यात्मिक क्रांती घडविणारे, वैदिक ज्ञानाचे अद्वितीय गुरू कृष्णकृपामूर्ती भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी ही ‘कुंतीदेवीची शिकवण’ परखड आणि सामर्थ्यशाली शब्दांतून आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे.
Sample Audio