जीवन शक्तीचा उगम (Jivan Shakticha Ugam)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
“जीवनाचे मूळ जीवन” हे पुस्तक म्हणजे, आधुनिक विज्ञान व वैज्ञानिकांची गृहीतके व सिद्धान्त यांची, कोणत्याही पूर्वतयारीशिवाय केलेली एक उत्कृष्ट समीक्षा आहे. विज्ञानामध्ये जिला प्रदीर्घ काळापासून खरे मानले गेले आहे आणि जिला फार प्रोत्साहन दिले गेले आहे, ती ही कल्पना आहे की जे काही आपण चारी बाजूंना पाहतो, ते सर्व भौतिक पदार्थाने बनलेले आहे आणि सर्व नैसर्गिक गोचर तत्त्वांची—जसे जीवशास्त्रीय, शारीरिक, मानसशास्त्रीय, खगोलशास्त्रीय—व्याख्या सरतेशेवटी इलेक्ट्रॉन व प्रोटॉनसारख्या मूलभूत कणांच्या कार्यांनुसार केली जाऊ शकते, जे भौतिक व रासायनिक नियमांचे पालन करतात. विशिष्टपणे श्रील प्रभुपाद, जे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानी आणि विद्वान आहेत, आधुनिक विज्ञानाच्या दोन प्रमुख सिद्धान्तांच्या तळाशी लपलेल्या निराधार पूर्वधारणांचे विश्लेषण करून त्यांचे पितळ उघडे पाडतात. हे दोन सिद्धान्त आहेत—जीवनाच्या उद्गमाचा सिद्धान्त आणि उत्क्रान्तिवादाचा सिद्धान्त.
Sample Audio