देवहूतिपुत्र भगवान कपिलदेवांचे उपदेश (Devahutiputra Bhagavan Kapil Devanche Upadesh)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
वैदिक शास्रांमध्ये अगोदरच दिलेल्या अत्युत्कृष्ट आणि आदर्श पद्धतीचा धिक्कार करणे आणि नव्यानेच शोध लावलेल्या योगप्रक्रियेच्या नावाखाली काही तरी फसवी गोष्ट लोकांपुढे मांडणे, ही सद्यःस्थितीत एक प्रथाच झालेली आहे. सहस्रावधी वर्षांपूर्वी देवहूतिपुत्र कपिलदेवांच्या रूपात भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतरित झाले. कपिलदेव वयात येताच त्यांच्या पित्याने, कर्दम मुनींनी प्रापंचिक निवृत्ती स्वीकारून संन्यास धारण केला. “माझ्या भौतिक इंद्रियांनी निर्मिलेल्या क्षोभामुळे मला अगदी वीट आला आहे, कारण हे प्रभो, या इंद्रियक्षोभामुळे मी अज्ञानाच्या गर्तेत पडले आहे.” याप्रकारे, देवहूतीने पूर्ण शरणागत होऊन आपण भवबंधनात गुंतल्याची स्पष्टोक्ती दिली आणि त्यातून मूक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी कपिलदेवांनी बिंदू सरोवराच्या काठी आपल्या मातेस ‘सांख्य सिद्धांत’ सांगितला. सर्व प्रकारे उपयुक्त आणि व्यवहारी अशा या तत्त्वज्ञानाचे; तसेच गुरूची योग्यता, ध्यानयोगाचे विज्ञान, चेतना, स्वरूप-सिद्ध व्यक्तीची लक्षणे इत्यादी गूढ विषयाचे वर्णन अत्यंत सोप्या भाषेत विश्वातील सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ते कृष्णकृपामृर्ती भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी या ग्रंथात केले आहे.
Sample Audio