भगवान् श्री चैतन्य महाप्रभू जीवन आणि शिकवण (Bhagavan Sri Chaitanya Mahaprabhu Jivan ani Shikvan)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
युगायुगांत भगवंतांनी पाठविलेले दिव्य प्रेरणा घेऊन आलेले गुरु आणि संत तसेच स्वतः भगवंतांनी घेतलेले अवतार या जगामध्ये प्रकट झालेले आहेत, परंतु सुवर्णावतार, भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांनी ज्या प्रकारे मुक्त हस्ताने आध्यात्मिक प्रेम वाटले आहे, त्या प्रकारे आजवर कुणाही वितरित केलेले नाही. चैतन्य महाप्रभू सन १४८६ या वर्षी, भारतामध्ये बंगाल प्रांतात प्रकट झाले आणि ते या पृथ्वीतलावर ४८ वर्षे राहिले, पंरतु तरीही त्यांनी आध्यात्मिक चेतनेमध्ये एक अशी क्रांती सुरु केली की, त्यामुळे लक्षावधी लोकांची जीवने पालटून गेली. तरुण वयातच एक महान संत म्हणून नावारुपाला आलेल्या चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या २४व्या वर्षी घर सोडले आणि त्यांनी भारतभरात प्राचीन वैदिक ज्ञानाची शिकवण दिली, जिचा त्या वेळेच्या समाजाला विसर पडला होता. जरी ते स्वतः एक पूर्णपणे वैराग्यशील संन्यासी होते, तरी त्यांनी लोकांना, त्यांच्या घरांत, कार्यक्षेत्रांत आणि समाजात राहून देखील आध्यात्मिक भावनेमध्ये कसे राहता येते हे शिकविले. म्हणून, जरी त्यांची शिकवण ही कालातीत असली, तरी आजकालच्या जगासाठी ती विशेष महत्त्वाची ठरते. भगवंतांच्या शुध्द प्रेमाच्या भावोन्मादाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या उद्देशाने, कोणीही करु शकेल अशी एक व्यावहारिक पध्दत त्यांनी शिकविली. या पुस्तकात या महान संताच्या असामान्य जीवनाचे चित्रण केलेले असून त्यांच्या शिकवणीचा सारांशही दिलेला आहे.
Sample Audio