Marathi Language Pack
Thumbnail Image of भगवद्‌गीता  जशी आहे तशी

भगवद्‌गीता जशी आहे तशी (Bhagavad Gita Jashi aahe Tashi)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

भारतीय आध्यात्मिक ज्ञानाचा मुकुटमणी म्हणून भगवद्‍गीतेचा अखिल विश्व‍ात गौरव केला जातो. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा प्रिय मित्र अर्जुन यांच्यामधील हा अलौकिक संवाद आत्मसाक्षात्काराच्या विज्ञानाचे परिपूर्ण दिशादर्शन करतो. मानवाचा स्वभाव, सभोवतालची प्रकृती, आणि अंततः त्याचा भगवंतांशी असलेला संबंध याविषयीचे सखोल आणि सुलभ ज्ञान भगवद्‍गीतेत प्रस्तुत करण्यात आलेले आहे. हे ज्ञान अन्य कोणत्याही ग्रंथात इतक्या सहजपणे वर्णिलेले आढळत नाही. कृष्णकृपामूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद हे विश्व‍ातील एक अग्रगण्य विद्वान तसेच साक्षात भगवान श्रीकृष्णांपासून चालत आलेल्या अखंडित गुरुशिष्य परंपरेतील एक आचार्य आहेत. परिणामी, त्यांनी लिहिलेले भगवद्‍गीतेवरील वर्तमान भाष्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांना अभिप्रेत असलेल्या अर्थाचेच सुगम स्पष्टीकरण आहे. गीता भागवत करिति श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे।। –संत तुकाराम

Sample Audio

Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)
Your IP Address: 216.73.216.97 Server IP Address: 169.254.129.2