This Portal is Connected to Production Database.

Marathi Language Pack
Thumbnail Image of आत्मसाक्षात्काराचे विज्ञान

आत्मसाक्षात्काराचे विज्ञान (Atma Sakshatkarache Vidyan)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

श्रील प्रभुपाद, जे एक खरेखुरे साधू होते, ज्यांच्याकडे सखोल बौद्धिक आणि आध्यात्मिक संवेदनशीलता होती, त्यांना आपल्या आध्यात्मिकदृष्ट्या वंचित समाजाकरिता वास्तविक तळमळ आणि करुणा होती. मानवजातीला प्रबुद्ध करण्याकरिता त्यांनी कालातीत प्राचीन ज्ञानाचा आधुनिक इंग्रजी भाषेत अनुवाद केला. हेच ज्ञान इतर आत्मज्ञानी गुरू देखील हजारो वर्षांपासून सांगत आलेले आहेत. या ज्ञानामुळे आपल्या अंतरातील आत्मा, प्रकृती, ब्रह्मांड आणि अंतर्बाह्य उपस्थित परमात्मा यांची रहस्ये आपोआप उलगडली जातात. या चित्तवेधक खंडामध्ये पुढील कुतुहलजनक वार्तालाप आहेत : श्रील प्रभुपादांचा एका प्रसिद्ध हृदयरोगविशारदाशी “आत्मा संशोधन” या विषयावर झालेला हृदयस्पर्शी वार्तालाप, पुनर्जन्माबाबत लंडन ब्रॉडकास्टिंग कंपनीसमोर केलेला गौप्यस्फोट, खऱ्या आणि खोट्या गुरूंबद्दल लंडन टाइम्समध्ये त्यांनी केलेले सूचक भाष्य, कृष्ण आणि ख्राइस्ट याबद्दल जर्मन बेनेडिक्टाइन चर्चच्या धर्मोपदेशकाशी केलेले संभाषण, प्रकृतीच्या कर्मनियमांवर त्यांनी दिलेला बोध, आध्यात्मिक साम्यवाद या विषयावर एका प्रमुख रशियन विद्वानाशी केलेला वार्तालाप आणि आणखी बरेच काही. आत्म-साक्षात्काराचे विज्ञान चित्तामध्ये अंतःप्रेरणा आणि ज्ञानोद्दीप्ती पेटवेल आणि आत्म्याला भगवंताशी जोडेल.

Sample Audio

Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)