श्रीमद् भागवतम् - (संक्षिप्त) गोष्टीरूपात (Srimad Bhagavatam Sankshipt Goshtirupat)
Author: श्री पूर्णप्रज्ञ दास
Description
श्री पूर्णप्रज्ञ दास यांनी ‘श्रीमद् भागवतम्’चा अतिशय काळजीपूर्वक आणि संपूर्ण निष्ठेने अभ्यास केला आहे. त्यांनी येथे अतिशय साध्यासोप्या शब्दात व गोष्टीरूपाने ‘श्रीमद् भागवतम्’ची मांडणी केल्यामुळेच आपल्याला त्यांच्या भक्तिकलेचा आस्वाद घेण्याची अपूर्व संधी प्राप्त झाली आहे. या गोष्टी तपशिलाने देत असताना, त्यापासून आपण काय बोध घ्यायचा, याचेही मोठे सुरेख विवेचन त्यांनी केले असून, या ग्रंथाचे खरे सौंदर्य त्यातच दडलेले आहे. ‘श्रीमद् भागवतम्’च्या जाणकार वाचकांना हा ग्रंथ अतिशय भावेल; कारण अखेर एक अभ्यासू प्रामाणिक विद्यार्थीच दुसऱ्या अभ्यासू प्रामाणिक विद्यार्थ्याच्या प्रयत्नांचे कौतुक करीत असतो. मात्र जे तुलनेने नवशिके आहेत आणि ज्यांनी श्रील प्रभुपाद यांच्या ‘श्रीमद् भागवतम्’चे काळजीपूर्वक अध्ययन केलेले नाही, त्यांनाही हा ग्रंथ खूप काही शिकवून जाईल हे निश्चित. हा ग्रंथ म्हणजे अगदी कमी वेळ व अल्पश्रमात ‘श्रीमद् भागवतम्’ जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
Sample Audio