श्रीमद्भागवत स्कंध एक (Srimad Bhagavat Skandha Ek)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
श्रीमद्भागवत हे एक तत्त्वज्ञानात्मक महाकाव्य आणि अभिजात साहित्य असून विशाल भारतीय साहित्यदालनामध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. वेदांमध्ये भारताचे कालातीत विज्ञान प्रकट झाले आहे. वेद मानवी ज्ञानातील सर्व शाखांना स्पर्श करतात. मूलत: श्रुतिपरंपरेमध्ये जतन करण्यात आलेले वेदांचे हे ज्ञान सर्वप्रथम लिपिबद्ध केले ते श्रील व्यासदेवांनी आणि यासाठीच व्यासदेवांना भगवंतांचा साहित्यावतार म्हणून ओळखले जाते. तत्पश्चात त्यांचे गुरू नारद मुनी यांनी त्यांना श्रीमद्भागवताच्या रूपाने वेदज्ञानाचे सार-संकलन करण्याची प्रेरणा दिली. वैदिक साहित्यरूपी वृक्षाचे परिपक्व फळ म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीमद्भागवत वैदिक ज्ञानाचे सर्वांत परिपूर्ण आणि अधिकृत स्पष्टीकरण आहे. श्रीमद्भागवत आपल्याला सर्वोच्च लोक गोलोक वृंदावनापर्यंत पोहोचण्यास साह्य करते. त्याचे द्वार सर्वांसाठी मोकळे आहे. मानव-जीवनाचा उद्देश हाच आहे (गोलोक वृंदावनापर्यंत पोहोचणे); कारण तेच सर्वोच्च पूर्णत्व आहे.
Sample Audio